प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनामूळे आणखी 7 जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळीचे शतक पूर्ण झाल्याने जिल्ह्यात घबराट पसरली आहे. शनिवार सायकाळपर्यंत चिपळूनमधील 2, खेडमधील 3 तर रत्नागिरी व दापोलीतील प्रत्येकी एकाच मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दरम्यान 24 तासात
अन्टीजेन चाचणीत 41 तर आरटीपीसीआर चाचणीत 25 असे एकूण 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली.
आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कामथे रुग्णालय 1 तसेच 3 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाला व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1788 झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आहेत.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 25
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 18
राजापूर – 1
लांजा – 5
संगमेश्वर – 8
घरडा रुग्णालय – 9
एकूण 25 + 41 = 66 पॉझिटिव्ह रुग्ण
आज प्राप्त माहितीनुसार 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खिंडी येथील 65 वर्षीय रुग्णाचा तसेच डोकलवाडी येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. खेड तालुक्यातील भोस्ते येथील 65 महिला रुग्ण, खेड येथील 55 वर्षीय रुग्ण, आणि लोटे येथील 70 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. दाभोळ, दापोली येथील 73 वर्षीय कोरोना रुग्णाचा आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील 72 वर्षीयकोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 101 झाली आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2747
बरे झालेले – 1788
मृत्यू – 101
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 858
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (दि. १३ ऑगस्ट २०२० )
जिल्हयामध्ये 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये, दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 47 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 89 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 29, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे -48, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -23, कोव्हीड केअर सेंटर घरडा -4, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 143 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन (दि. 15 ऑगस्ट 2020 )
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 52 हजार 408 इतकी आहे.
*