प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची एकुण संख्या 64 झाली आहे. रविवार सायंकाळपासूनच्या 24 तासात 104 नवे रुग्ण सापडले आहेत एकूण रुग्णांची संख्या 2000 च्या उंबरठ्यावर पोचली आहे
रविवारी रात्री 51 तर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात 53 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1985 इतकी झाली आहे
सोमवारी दापोली तालुक्यातील बुर्गुंडी व चिपळूण तालुक्यातील सती येथील येथील रुग्णांचा मृत्यू झाला.अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या एका रुग्णाच सायंकाळी मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 64 झाली आहे
आज सायंकाळच्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 53 रुग्णांचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 20
रत्नागिरी अँटिजेन 2
कामथे 28
दापोली 2
गुहागर 1
Previous Articleविक्रीच्या दबावाने सेन्सेक्स 667 अंकांनी कोसळला
Next Article आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार









