प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी गुरुवारी सायंकाळी पाप्त अहवालानुसार जिह्यात 38 नवे कोरोनाबाधित आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 873 झाली आह़े गत 24 तासात जिह्यात आणखी 5 कोरोना बळीची वाढ झाल्याने जिह्याचा मृत्युदर 3.68 वर पोहोचला आह़े गुरुवारी 109 जण कोरोनातून बरे झाल्याने डिस्जार्च दिल़ा रुग्णांचे पमाण कमी होत असले तरी वाढत्या मृत्युदराची चिंता कायम आह़े.
जिह्यामध्ये आणखी 5 कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावल्याची नोंद झाल़ी यामध्ये संगमेशवर मधील 2 पुरुष, रत्नागिरीमधील 1 महिला, खेड व गुहागर पत्येक 1 पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 290 झाला आह़े.
गुरुवारी झालेल्या एकूण 265 चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचणीत 25 व ऍन्टीजेन चाचणीत 13 रुग्ण आढळले. या 38 बाधितांमध्ये रत्नागिरीतील सर्वाधिक 13 रुग्ण आहेत़ बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 950 झाली असून हे प्रमाण 88.27 टक्के झाले आहे. कोरोनातून बरे होणाऱयांचे वाढते प्रमाण व कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण या बाबी सकारात्मक असल्या तरीही मृत्यूदरातील वाढीची चिंता मात्र कायम आहे.
Previous Articleपुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त
Next Article चिपळूण ढोक्रवली येथे विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू









