आणखी 16 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 108 वर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवार रात्रीपासून मिरजेतून एकूण 82 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 अहवाल निगेटिव्ह आले असून 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचे शतक पूर्ण झाले असून रूग्णसंख्या 108 वर पोहचली आहे.
रत्नागिरीत आणखी 4 शिकाऊ नर्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून बाधित नर्सची संख्या 10 झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळलेल्या श्रुंगाळतलीत सुमारे 2 महिन्यांनी नवे 4 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अहवालांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी 10 अहवाल
6 पॉझिटिव्ह 4 निगेटीव्ह
कळंबणी 60 अहवाल
सर्व निगेटिव्ह
संगमेश्वर 6 अहवाल
6 पॉझिटिव्ह
गुहागर 4 अहवाल
4 पॉझिटीव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामधील सर्व व्यक्ती विलगीकरणात मध्ये होत्या. यातील बहुतेक जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
रुग्णांच्या गावांची नावे खालील प्रमाणे
धामपूर 2 रुग्ण, कोळंबे 2 रुग्ण, भिर्कोंड 1 रुग्ण, कसबा 1 रुग्ण सर्व संगमेश्वर तालुका
शृंगारतळी 4 रुग्ण गुहागर तालुका
नर्सिंग होस्टेल 4 रुग्ण कार्ला 1 रूग्ण, रत्नागिरी 1 रुग्ण








