प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवार सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात आणखी 94 रुग्ण सापडले असून बधितांची एकूण संख्या 3 हजार 881 झाली आहे.
अँटीजेन टेस्टमधील ५० व आरटीपीसीआर टेस्टमधील ४४ रुग्णांचा यात समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 23 रुग्ण सापडले आहेत.
आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरी १३, दापोली २, गुहागर २, चिपळूण ३ , संमेश्वर १७ , राजापूर २, लांजा ५ तर अँटीजेन टेस्टमध्ये दापोली १०, खेड ११, गुहागर ९, चिपळूण ८, रत्नागिरी १० , लांजा २ रुग्ण सापडले आहेत
Previous Articleसोलापूर शहरात आज 109 रुग्ण बरे तर 44 कोरोना पॉझिटिव्ह
Next Article विरोधकांना हार पचवता आलेली नाही – मंगेश राजपुरकर









