प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी, नाले, ओढे दुधडी भरुन वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणेना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पुरपरिस्थितीतील नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील चिपळूण पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. रत्नागिरी चांदेराई पूल पाण्याखाली. जिल्हा प्रशासनाची मदतीसाठी तारांबळ उडाली आहे.
Previous Articleलोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब
Next Article रत्नागिरी : खेड बाजारपेठ पुराच्या विळख्यात









