215 शेतकऱयांना वीमा परतावा, कृषी विभागाची माहीती
प्रतिनिधी/रत्नागिरी
परतीच्या पावसाने जिह्यातील भातशेतीचे नुकसान झाले आह़े. यंदा प्रधानमंत्री पीक वीमा योजनेसाठी जिह्यातील 1 हजार 304 शेतकर्यांनी सहभाग नोंदवला होत़ा. मात्र यापैकी नुकसान झालेल्या 215 शेतकर्यांनी 72 तासामध्ये नुकसानीची माहीती दिल्यामुळे या शेतकर्यांना 13 लाख 12 हजार रुपयांचा वीमा परतावा जाहीर झाल्याची माहीती कृषी विभागाने दिल़ी.
निर्सगाचा लहरीपणा व अवेळी पावसामुळे पीकांवर परिणाम होवून शेतकर्यांचे नुकसान होत आह़े. त्यामुळे शेतकर्यांचा कल वीमा योजनेकडे वाढला आह़े. यावर्षी 1 हजार 304 शेतकर्यांनी 300 हेक्टरसाठी 2 लाख 70 हजाराचा वीम्याची रक्कम भरली होत़ी. संततधार व परतीच्या पावसामुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले त्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधला होत़ा त्यामुळे पंचनामे तात्काळ होवून 13 लाखांचा वीमा परतावा शेतकर्यांना जाहीर झाला आह़े. जिल्ह्याचे उंबरडा उत्पादन जास्त असल्याने खरीप हंगामाचा परतावा पाप्त होत नव्हत़ा. भातपीकासह नाचणी पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी लाभार्थी ठरले आहेत़. पीक वीम्याचा लाभ घेणारे 208 शेतकरी भात उत्पादक असून 7 शेतकरी नाचणी उत्पादक आहेत़. पीक वीम्यासाठी ऑनलाईन तकारी दाखल करण्यात येत असून 215 शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्य़ा.
परतीच्या पावसाने तयार भातपीकासह नाचणीचे नुकसान केले आहे. तयार पीक जमीनदोस्त झाल्याने पावसाने भाताला अंकूर फुटले त्यामुळे हा भात वाया गेला. नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करुन याबद्दलचा अहवाल वीमा कंपनीला सादर करण्यात आला त्यामुळे परतावा जिह्यातील शेतकऱयांना परतावा जाहीर झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी सांगितल़े.
Previous Article101 वर्षीय मारिया यांची कोरोनावर 3 वेळा मात
Next Article शेतकऱयांचा कल आता हंगामी शेतीकडे









