अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे उघड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े या अकाऊंटचा वापर करून अनेकांना पेंड रिक्वेस्ट पाठवली जात आह़े या अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्ट स्वीकारू नये, असे आवाहन ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांनी केले आह़े
समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत़ त्यासाठी अधिकाऱयांच्या नावाचा सर्रासपणे वापर करण्यात येत आह़े यापूर्वी रत्नागिरीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले होत़े या खात्याच्या माध्यमातून इंगळे यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले होत़े हा प्रकार समोर येताच इंगळे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी मात्र अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आह़े
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याच नावाचा वापर करण्यापर्यंत संशयितांची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान समाज माध्यमांचा वापर करताना काळजीपूर्वक कराव़ा तसेच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना अधिक माहिती घ्यावी, खात्री करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आह़े









