प्रतिनिधी / लांजा
जमीन जागेच्या वादातून स्वतःच्या आई आणि भावाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच अंगणातील लाकडे जाळल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी कोत्रेवाडी येथील संतोष बाळकृष्ण कोत्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा कोत्रेवाडी येथील श्रीमती सुनिता बाळकृष्ण कोत्रे (वय 70 वर्षे) व संतोष बाळकृष्ण कोत्रे हे नात्याने आई व मुलगा आहेत. त्यांच्यामध्ये जमिनी जागेच्या व घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहेत. लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनिता बाळकृष्ण कोत्रे यांनी आपल्या अंगणात सरपणासाठी लाकडे जपून रचुन ठेवली होती. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास संतोष कौत्रे हा घरी येऊन त्याने ही लाकडे पेटवून दिली.
तसेच स्वतःच्या आई श्रीमती सुनीता कोत्रे यांच्या पुढील दरवाजावर कोयतीने मारून दरवाजाचे नुकसान करून रूममध्ये हातात सुरे घेऊन प्रवेश केला तसेच तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. सर संतोष ची बायको स्वाती संतोष कोत्रे हीने देखील हातात कोयता घेऊन अंगणातून शिवीगाळ करत मारण्याच्या धमक्या दिल्या. तर फिर्यादी सुनिता बाळकृष्ण कोत्रे हीचा दुसरा मुलगा संजय कोत्रे यालाही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी सुनिता बाळकृष्ण कोत्रे हिने केलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुलगा संतोष बाळकृष्ण कोत्रे आणि त्याची पत्नी स्वाती संतोष कोत्रे या दोघांवर भादवि कलम 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.









