प्रतिनिधी / रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील वालोपे-वाशिष्ठी नदीकिनारी विद्येश चंद्रकांत खाडे (वालोपे-गणेशवाडी) हा बेकायदा हातभट्टीची दारु काढण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे गुरुवारी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत नवसागर, गावठी दारु, तसेच इतर सहित्य असा एकूण 57 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केला. तसेच गावठी दारुचे रसायनाने भरलेले ड्रम ओतून हातभट्टीही उद्ध्वस्त केली.