वार्ताहर / मौजेदापोली
चार महिन्यांवर आलेल्या गणेश चतुर्थी निमित्त दापोली तालुक्यातील चित्र शाळांमध्ये गणेशमुर्ती घडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर काही चित्रशाळांमध्ये गणेशमुर्ती घडविण्यात आल्याचे दापोलीतील मुर्तीकारांनी तरूण भारतला सांगितले.
कोकणासह सर्वत्रच गणेश चुतर्थी उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षी कोरोनाचे संकट आल्याने हा सण घरच्या घरी साजरा करण्यात आला. तर यावर्षी देखील मागील पद्धतीने हा उत्सव साजरा करावा लागणार असल्याचे वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे समोर येत आहे. दापोलीतील गणेश चित्र शाळांमध्ये गणपतीच्या मुर्तींना आकार देण्याचे काम मुर्तीकारांनी सुरू केले आहे. मात्र या कामांमध्ये देखील लाŸकडावून व इतर गोष्टींचा अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. दापोली बाजारपेठेतील श्री गजगणेश चित्रशाळेत मुर्ती बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक मुर्त्यां घडविण्यात आल्या असून उर्वरीत कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यात गणेशभक्तांसाठी गणेशमुर्त्या सज्ज असणार आहेत.









