प्रतिनिधी / खेड
काल, बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या धुवाधार पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडीच्या पुलाचे पाणी मुख्य बाजारपेठेत घुसल्याने एकच हाहाकार उडाला. पावसाचे थैमान सुरूच राहिल्याने गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठ पुराच्या विळख्यातच अडकली होती. मटण मच्छी मार्केट, पोत्रिक मोहल्ला, साठे मोहल्ला, निवाचा तळ, गांधी चौक येथील १०० हून अधिक दुकानांमध्ये ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी घुसून कोट्यावधी रूपयांची हानी झाली आहे.
या परिसरातील रहिवाशांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. नारंगी नदीही जलमय होवून खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगनजीक पाणी घुसल्याने रात्रीपासूनच दापोली मंडणगड-खाडीपट्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक शिवतररोड मार्गे वळवण्यात आली. तीनबत्ती महामार्गावरील भरणे येथील जुना जगबुडी पुलही पुराच्या पाण्यात अडकला. पावसाच्या रूद्रावतारामुळे जनजीवन पुरते कोलमडले आहे. २००५ नंतरचा हा महाभीषण पूर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









