हिराभाई बुटाला विचार मंचचे सहकार्य, कार्डियाक रूग्णवाहिकेचेही लोकार्पण
प्रतिनिधी/खेड
खेड नगरपरिषद हद्दीतील एकविरा नगर येथील नगरपरिषद दवाखान्यात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरचे उद्घाटन आज, रविवारी (दि.१२) दुपारी ३ वाजता खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कोविड सेंटरसाठी हिराभाई बुटाला विचार मंचचे सहकार्य लाभले आहे. याचवेळी खेड नगरपरिषदेसाठी उपलब्ध झालेल्या कार्डियाक रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळाही होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार व एच.डी.एफ सी. बँक यांच्या सौजन्याने कळंबणी व दापोली उपजिल्हा रूग्णालयात ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून ही सेवा देखील सोमवारपासून सणांसाठी खुली होणार आहे. कोकणातील नागरिकांना उच्च प्रतिची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी उद्योजक कौस्तुभ बुटाला यांनी पुढाकार घेतला असून यापुढे कोकणातील रुग्णांना मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी जावे लागू नये, याकरिता हिराभाई बुटाला विचार मंचच्या माध्यमातून कार्डियाक रूगणवाहिका उपलब्ध झाली आहे.
कोरोनाच्या संकटात कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्ष खेडेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नगरपरिषद दवाखान्यात सुरू होणाऱ्या कोविड सेंटरमुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे. हिराभाई बुटाला विचार मंचच्या सौजन्याने सुरू होणाऱ्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन प्रणालीचा शुभारंभही खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला, उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, वैद्यकीय अधीक्षक एस. पी. गरूड, डॉ. सदरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आदी उपस्थित राहणार आहेत.
Previous Articleकोकण मार्गावर नियमित रेल्वेगाड्यांसह जलद गाड्या सुरू करा
Next Article महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यांसाठी नवी नियमावली









