‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत १९५५३ घरांचे सर्वेक्षण, तपासणीत तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / खेड
तालुक्यात आतापर्यंत १२२२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून १०१० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी रात्री प्राप्त अहवालानुसार आणखी ६ जणांचे कोरोना अठवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींच्या स्वबचे नमुने घेण्यात आले. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ५६ वर पोहचली आहे.
तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रूण लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत आढळले असून हा आकडा ३२० वर पोहचला आहे. नगरपरिषद हद्दीत २६२, आंबवली केंद्रातंर्गत १६५, शिव- ११७, फुरूस १२४, तिसंगी १०६, तळे ५७, कोरेगाव ४०, वावे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासारी आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानातंर्गत तालुक्यातील १८३ गावांचे ६८ पथकांमार्फत सर्वेक्षण हाती घेण्यात आले. याकरिता २०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. शहरात आतापर्यंत ६९९४ घरांपैकी २४१८ घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून ३४.५७ टक्के सर्वेक्षणाचे काम झाले आहेत. ग्रामीण भागात ७७ पथकांद्वारे १७१३५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी मोहिमेतंर्गत २५ सप्टेंबरपर्यंत ४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुका वैद्यकीय डॉ. राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









