प्रतिनिधी / खेड
येथील रेल्वे स्थानकाजवळ सावर्डे येथून खेडकडे येणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल राजेश चव्हाण यांना १५ हजार रूपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट सापडले. त्यांनी तो पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. राजेश चव्हाण हे सावर्डे येथे कर्तव्य बजावत आहेत. महत्त्वाच्या कामानिमित्त खेड येथे दुचाकीवरून येत असताना रेल्वे स्टेशनजवळ १५ हजार रोख रक्कम व कागदपत्रे असलेले पाकीट सापडले. त्यांनी संबंधित व्यक्तीशी मोबाईलवर संपर्क साधून खात्री पटवून घेतली. त्यानंतर संबंधित व्यक्तीस पाकीट परत केले.









