प्रतिनिधी / खेड
गेल्या दोन दिवसापासून जिओ कंपनीच्या नेटवर्कचा पुरता बोजवाराच उडाला असून नेटवर्कअभावी मोबाईल नावापुरतेच उरले आहे. एकीकडे बीएसएनएलसह अन्य खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचे पुरते तीनतेरा वाजलेले असतानाच जिओ नेटवर्कच गायब झाल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून जिओची सेवा ठप्प आहे.
बहुतांश ग्राहकांनी जिओ कंपनीच्या सेवेला पसंती दिली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसापासून जिओ सेवेतील व्यत्ययामुळे एकमेकांशी देवाण – घेवाण करणे अवघड बनले आहे. जिओ कंपनीच्या व्यवस्थापनाने ही बाब गंभीरपणे घेवून सेवेतील व्यत्यय तातडीने दूर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









