प्रतिनिधी/खेड
कोल्हापूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या तालुक्यातील आवाशी-मधलीवाडी येथील ६४ वर्षीय वृद्धेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरडा कोव्हिड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारार्थ रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी गंभीर बनल्याने अधिक उपचारार्थ कोल्हापूर येथील कोव्हिड सेंटर येथे दाखल करून तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर तिचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ६ वर पोहचली आहे. यापूर्वी अलसुरे, शिवतर, कुंभाड, फुरूस, ऐनवली येथील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रविवारी रात्री प्राप्त अहवालानुसार ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घाणेखुंट, आवाशी येथील प्रत्येकी दोन रूग्णांसह लोटेतील ३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील व्यक्तींचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले.









