प्रतिनिधी / खेड
तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून मिरज इथे पाठवलेल्या तिघांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून भरणेतील एका आरोग्यसेविकेसह अन्य दोघांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा हादरले आहे. आरोग्य यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आहे. तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या 15 वर पोहचली आहे.









