महिलेची शहर पोलिसांत तकार, तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा
प्रतिनिधी/रत्नागिरी
‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून तुम्हाला 25 लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. अशी बतावणी करून महिलेला 5 लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कैसरबानू इब्राहिम काझी (43, ऱा गवळीवाडा रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कैसरबानू यांनी शहर पोलिसांत 3 संशयितांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. आकाश वर्मा, अनिल कुमार यादव व नंदकीशोर पासवान अशी फसवणूक करणार्या तिघा संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैसरबानू यांना 11 नोव्हेंबर 2020 रोजी व्हॉटसऍप वर मेसेज आला होता. यामध्ये तुम्हाला कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून 25 लाख रूपयांची लॉटरी लागली आहे पैसे मिळविण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या व्यवस्थापकांशी बोला असे सांगण्यात आले. कैसरबानू यांना पाठविण्यात आलेल्या बँक मॅनेजरच्या नंबरवर केला असता त्यानेही 25 लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. त्यानुसार कैसरबानू यांना आपल्याला 25 लाख रूपयांची लॉटरी लागली असल्याची खात्री पटली. दरम्यान संशयित आरोपीत यांनी कैसरबानू यांना वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन करून त्यांचा विश्वास संपादन केला. यावेळी तुमचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्याचे चार्जेस, करन्सी कन्व्हर्ट करण्याचे चार्जेस, जीएसटी चार्जेस व चौकशीचे चार्जेस असे विविध बहाणे करून तकारदार यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरवात केली.
अशा प्रकारे संशयित आरोपित यांनी तकारदार यांना 5 लाख रूपये आपल्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. मात्र पैसे जमा करून देखील संशयित आरापीत हे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे तकारदार यांच्या निदर्शनास आले. तसेच उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तकारदार यांच्या लक्षात आले. या पकरणी तकारदार यांनी शहर पोलिसांत फसवणूक झाल्यापरकणी संशयितांविरूद्ध तकार दाखल केली. पोलिसांनी तिनही आरोपिंविरूद्ध भादवि कलम 420 सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या आवाहनाकडे होतेय दुर्लक्ष
मोबाईल फोनवर येणाऱया पैशाच्या अमिषांना बळी पडू नका तसेच आपला बँक एटीएम पीन, बँकेची माहिती अज्ञात व्यक्तीला शेअर करू नय़े असे सातत्याने आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष लोक करत असून अशा पकारे लोक भूलथापांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.
Previous Articleसात चिमुकल्यांसह 14 वऱ्हाडी ठार
Next Article काँग्रेसकडून ज्येष्ठांची धोरणात्मक समित्यांवर वर्णी









