खेड काँग्रेसच्या मागणीची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून दखल
प्रतिनिधी/खेड
कोरोनाच्या संकटात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आस्थापनेवरील ५ अधिपरिचारिका यांच्या सेवा कामथे उपजिल्हा रूग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रश्नी तालुका काँग्रेसने जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेत या अधिपरिचारिका अन्यत्र वर्ग करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अधिपरिचारिका अन्यत्र वर्गचा आदेश रद्द करत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील कोरोनाबाधितांवर आरोग्य यंत्रणा उत्तमप्रकारे उपचार करून चांगले काम करत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला असतानाच प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील ५ अधिपरिचारिका कामथे उपजिल्हा रूग्णालयात वर्ग करण्याचे आदेश कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना दिले होते.
या अधिपरिचारिका कामथे उपजिल्हा रुग्णालयात गेल्यास खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होणार होती. याशिवाय कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कार्यरत कंत्रणेवरील ताण देखील वाढणार होता. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयातील एकही अधिपरिचारिका दुसरीकडे वर्ग करू नये, अशी आग्रही मागणी सांगितले. करत तालुका काँग्रेसने आमदार हुस्नाबानू खलिपे यांची भेट घेवून परिस्थितीचे गांभिर्य त्यानुसार आमदार अँड. खलिपे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीब, माजी नगरसेवक बशीर मुजावर, अनिल सदरे आदींनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची भेट घेत आदेश रद्द करण्याची विनंती केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









