खेड / प्रतिनिधी
तालुक्यातील उधळे येथील एका घरातून लाखोचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला येथील पोलिसांनी 5 तासातच जेरबंद केले. सुदेश गणपत महाडिक वय 35 रा. कळंबणी -वाळजवाडी असे चोरट्याचे नाव आहे. ऋतुजा वेस्वीकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 96 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता.
याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्यासह पोलीस शिपाई संकेत गुरव, अजय कडू, साजिद नदाफ, सुरेश आंबेडे यांच्या पथकाने चोरट्याला गजाआड केले.









