प्रतिनिधी/रत्नागिरी
आज रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 100 कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाला लस देण्यात येणार आहे. यामध्ये कोव्हीड लसीचा पहिला डोस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सई धुरी यांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी दिली.
यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कमलापूरकर , आरोग्य सभापती बाबू म्हाप, व इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दर दोन तासाला 25 जणांना लस देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 5 सेंटर सुरू करण्यात आले असून प्रत्येक सेंटर 100 आरोग्य स्टाफ ला लस देण्यात येईल.
या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ऑनलाईनद्वारे माहिती देताना शुभेच्छा दिल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









