मिर्या-नागपूर महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कारवाई
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते कुवारबाव दरम्यानच्या मिर्या-नागपूर या महामार्गावर अनधिकृत बांधकामांचे जाळे पसरले आहे. महामार्गालगत गेल्या काही महिन्यात अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहू लागली होती. ही बांधकामे हटविण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ पडत होती. पण अखेर शुकवारी बांधकाम हटविण्यासाठी मुर्हूत सापडला. यातील अनेक बांधकामांवर बुलडोझर फिरवून भूईसपाट करण्याची कारवाई करण्यात आली.









