प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी चांगलाच जोर धरल़ा मुसळधार पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाल़ी शेतीची कामांना सर्वत्र वेग आला असून बळीराजा चांगलाच सुखावला आह़े दरम्यान, येत्या 24 तासात जिह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आह़े
सोमवारी जिह्यात कमी-अधिक पावसाने हजेरी लावली होत़ी यामध्ये दापोली 21 मिलिमीटर, खेड 14 मिलिमीटर, गुहागर 82 मिलिमीटर चिपळूण 43 मिलिमीटर, संगमेश्वर 31 मिलिमीटर, रत्नागिरी 17 मिलिमीटर, लांजा 61 मिलिमीटर, तर राजापूर 60 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होत़ी मंगळवारी देखील दिवसाभर चांगला सुर्यप्रकाश दिसून आल़ा मात्र सायंकाळनंतर पावसाने चांगलाच जोर पकडत त्रेधातिरपिट उडवल़ी
मागील आठवडय़ात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होत़ी या पावसामुळे रत्नागिरी शहर परिसरातील रस्त्यावर 3 फुटांपेक्षा अधिक पाणी साचल्याचे दिसून आल़े त्यामुळे नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या नाले सफाईची पोलखोल पावसाने केली होत़ी मात्र पुन्हा एकादा नाले सफाईचे काम पूर्ण करण्यात आले असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आह़े
रत्नागिरी जिह्यात खरीपाच्या हंगामाला सुरूवात झाली आह़े त्यासाठी पावसाचा जोर वाढणे बळीराजाला सुखावणारे आह़े कारोना आणि निसर्ग चक्रिवादळामुळे मेटाकुटीला आलेल्या कोकणातील बळीराजाला शेतीच्या कामात व्यस्त झाला आह़े या पावसामुळे शेतीकामाला वेग आल्याचे चित्र गावातून दिसून येत आह़े
खेडला पावसाने झोडपले
खेडः मंगळवारी सकाळपासून धुवाँधार कोसळणाऱया पावसाने दिवसभर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. पहिल्याच पावसात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी मुख्य रस्त्यांवर आले. महाडनाका, अण्णाच्या पऱयानजीक पाणी मुख्य रस्त्यावर साचले होते. भरणे परिसरातही हीच परिस्थिती कायम होती. तालुका कृषी रोपवाटिकेसह मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्यावरच आलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची फसगत झाली.









