महाविद्यालयातील घटनेने शहर परिसरात खळबळ, जिल्ह्यात 27 नवे रुग्ण,
रत्नागिरीत सर्वाधिक रुग्णांची नोंद,दोन महिलांचा कोरोनाने मृत्यू
प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरातील एका महाविद्यालयात सात प्राध्यापक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल़े या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे हे प्राध्यापक ज्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आले, त्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तसेच मागील 24 तासात 2 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात संगमेश्वर तालुक्यातील 52 वर्षीय तर दापोलीमधील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येत आहे तर जिल्ह्यामध्ये मृतांचा आकडाही वाढत आहे. एकूण मृतांची संख्या आता 362 इतकी झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून केलेल्या 234 चाचण्यांपैकी 27 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी सर्वाधिक 15, चिपळूण 3, खेड 6, संगमेश्वर 2 व लांजा 1 असे रुग्ण मिळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 9 हजार 856 इतकी झाली आहे तर मागील 24 तसात 7 बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडले. यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 9 हजार 315 वर पोहोचली आहे जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.51 टक्के इतके आहे जिह्याचा मृत्यूदर 3.67 इतका आहे
कोरोना पॉझिटिव्ह गेला लग्नमंडपात
कोराना पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण चक्क लग्नमंडपात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाल़ा या इसमाच्या बेफिकीरपणे वागण्याच्या वृत्तीमुळे लग्नमंडपातील वऱहाडी मंडळींना मनस्ताप सहन करण्याची वेळ आल़ी रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालय येथे अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना घेण्यासाठी आरोग्यपथके रवाना केली होत़ी यावेळी तालुक्यातील एका गावात आरोग्यपथक गेले असताना अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण मिळून आला नाह़ी यावेळी गावचे सरपंच व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता संबंधित व्यक्ती ही लग्नमंडपात असल्याचे सांगण्यात आल़े त्यानुसार आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्नकार्याच्या ठिकाणी दाखल होत संबंधित व्यक्तीला अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिल़ी हा प्रकार वऱहाडी मंडळींना समजताच सर्वांना ऐन थंडीत चांगलाच घाम फुटल़ा आता किती लोकांची कोरोना चाचणी करायची, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे
जिल्ह्यातील कोरोना स्थिती :
एकूण रुग्ण – 9856
नवे रुग्ण – 27
नवे मृत्यू – 02
एकूण मृत्यू – 362
वरवली-धुपेवाडीत आणखी 6 जणांना कोरोना
कोरोनाबाधितांची संख्या 55वर पोहोचली, ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली
तालुक्यातील वरवलीत कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार आणखी 6 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. नव्या रुग्णांमुळे वरवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 55 वर पोहोचली आहे. दिवसागणिक सापडणाऱया कोरोनाबाधितांमुळे ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत 1556 इतकी झाली आहे.
तालुक्यातील वरवली-धुपेवाडीतील 27 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून एकामागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या वरवलीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांच्या प्रयत्नांना अपयशच येत आहे. आरोग्य पथकांचा तळ अजूनही तेथेच कायम असून सर्वेक्षणाची मोहीमही अधिक तीव्र करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे.
वरवली-धुपेवाडीपाठोपाठ आंबवलीतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. आंबवली व किंजळेत प्रत्येकी 2 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. वावेत 4, आपेडे 2 व भरणे 1 कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. वरवलीपाठोपाठ वावे, आपेडे, भरणे, किंजळे येथेही कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून या ठिकाणीही डोअर टू डोअर सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात येत आहे. वरवलीत 27 रुग्ण आढळल्यानंतर चार वाडÎांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक ओलांडताच अवघे गाव कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. गाव सील केल्यामुळे हातावर पोट असणाऱया ग्रामस्थांचे हाल होऊ नयेत, यासाठी आमदार योगेश कदम यांनी सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सॅनिटायझर व मास्कचेही वाटप करणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले.









