प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या भाटय़े सुरूबन येथील झाडीमध्ये मानवी सांगाडा आढळून आला आह़े ही घटना रविवारी दुपारी स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आल़ी या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. दरम्यान शहर परिसरातून बेपत्ता झालेल्या तरूणाचा हा मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े त्यानुसार ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले आह़े
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत असून केवळ सांगाडा शिल्लक आह़े त्यानुसार हा मृत्यू महिनाभरापूर्वी झाल्याची शक्यता वर्तवली जात आह़े दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होत़े
घटनास्थळी पोलिसांना मृताची ओळख पटवण्यासंदर्भात काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत़ दरम्यान तरूणाचा मृत्यू हा घातपात आहे का, या दिशेनेही पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े दरम्यान आढळलेल्या सांगाडय़ाचा नमुना डीएनए तपासणीसाठी पाठवणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. रविवारी दुपारी हा मानवी सांगाडा आढळून आल़ा घटनास्थळ हे मुख्य रस्त्यापासून जवळ असतानाही कुणाचे लक्ष या ठिकाणी कसे गले नाह़ी तसेच मृतदेह कुजण्याचा वास कुणाला कसा आला नाही, याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान पोलिसांकडून या घटनेची नोंद शहर पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े








