उद्यमनगरमध्ये दुकानाचे मोठे नुकसान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील उद्यमनगर येथील फास्टफुड सेंटरमध्ये गुरूवारी रात्री 1 च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाल़ा फास्टपुड सेंटर बंद असल्याने स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. स्फोटात दुकानाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े
उद्यमनगर परिसरात चालणाऱया या फास्टफुड सेंटरमध्ये व्यावसायिक सिलिंडर ठेवण्यात आला होत़ा हा सिलिंडरचा गुरूवारी रात्री अचानक स्फोट झाल़ा स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल़ी ही लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले होत़े









