प्रतिनिधी / रत्नागिरी
प्रयोगशाळांमध्ये सरासरी दैनिक तपासणीच्या गतीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणातवाढ करण्यात आल्याची नोंद राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. गेल्या तीस दिवसात सरासरी 179 तपासणी सरासरी असलेल्या रत्नागिरी प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरात प्रति दिन 249 नमुन्यांची तपासणी झाली आहे. यासोबतच अँटीजेन तपासण्यांचे प्रमाण देखील वाढवून आले आहे. गेल्या चोवीस तासात प्रयोग शाळेतून केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून अँटीजेन चाचण्यांमध्ये इतर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्कर्ष आले आहेत यामुळे रुग्णां लवकर निदान करण्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गती प्राप्त झाली आहे.
गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 91 तर आरटीपीसीआर चाचणीत 7 असे एकूण 98 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2845 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, तसेच 25 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाले व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1816 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 7
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 29
कळबणी – 4
कामथे – 45
घरडा रुग्णालय – 13
एकूण 98 पॉझिटिव्ह रुग्ण
शांतीनगर, रत्नागिरी येथील 15 ऑगस्ट रोजी सकाळी ऍ़न्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 52 वर्षीय कोरोना रुग्णाचा रात्री 12.45 वाजता मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 102 झाली आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2845
बरे झालेले – 1816
मृत्यू – 102
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 927
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









