प्रतिनिधी/ रत्नागिरी
पेट्रोल व डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढत आहेत़ मुंबईत डिझेल दर ऐतिहासीक उच्चांकी पातळीवर असून पेट्रोलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या बरोबर आहेत़ नजीकच्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आह़े
रत्नागिरीतही शनिवारी पेट्रोल 91.72 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 80.66 रूपये प्रतीलिटरच्या घरामध्ये गेले आह़े डिझेलचा दरही उच्चांकी पातळीवर पोहोचला आह़े यामुळे सर्वसामान्यांमधून वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़ अनेक शहरांमध्ये पेट्रोल 90 पार केल्यामुळे तसेच डिझेलच्या दरामध्येही वाढ झाल्यामुळे नजीकच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता आह़े आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या महिन्याभरात सुमारे 10 ते 12 डॉलर्स प्रति बॅरल वाढले आहेत़ परंतु ओपेककडून उत्पादनात करण्यात आलेली घट तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे कच्चे तेल महागल्याची शक्यता आह़े त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आह़े









