प्रतिनिधी/रत्नागिरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज रत्नागिरीत कोरोना लॅबचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की या लॅब च्या उद्घाटन प्रसंगी मी सर्व यंत्रणेला धन्यवाद देतो. आपल्या राज्यातील ही 87 वी प्रयोगशाळा आहे. कोरोना जेव्हा आला तेव्हा फक्त 2 प्रयोगशाळा होत्या. संकट आल्यावर आपण शहाणे होतो. आपण विकास करत असताना आपण स्वतःला विसरलो. या कोरोना ने खूप चांगल्या गोष्टी शिकवल्यात. प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर कसे करता येईल याकडे मि बघतो. कोरोना संकटामुळे सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर पडलं. कोरोना चा आकडा वाढणार नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उभी राहिलेली लॅब त्या दर्जाची चालवणे महत्त्वाचे आहे. कोकण आणि ठाकरे संबंध हे काही वेगळे सांगायला नको, महाराष्ट्राचे प्रेम हीच माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की कोकणात ट्रॉमा सेंटर उभारण्याची गरज आहे. या लॅबमध्ये कॅन्सर, टीबी यांची देखील तपासणी होऊ शकते असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या तर ना उदय सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि.प अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, प्रसाद लाड, मुख्यकार्यकारी अधिकारी बघाटे, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी ट्रमा सेंटर बद्दल मागणी केली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









