प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी अत्यंत तुटपुंजा व्यवस्थेवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी मागील सुमारे ४ महिन्यांपासून कोरोना विरुद्ध लढा लढत आहेत. आजवर १७६९ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. कोरोनाची भीतीच रुग्णाला अर्धमेला करून टाकते व तिचा परिणाम रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीवर होतो. आवश्यक उपचार सुरु असताना त्यांना गुण येण्यासाठी रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहणे गरजेचे असते. यासाठीच नव्याने सुरु झालेल्या महिला रुग्णालयात येथील डॉक्टर अश्फाक काझी यांनी भूषण बर्वे व मॅथ्यू ब्रदर्स व राजरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने म्युझिक थेरपीचा नवा प्रयोग अंमलात आणला आहे.
भूषण बर्वे हर राजरत्न पपदाधिकारी आहेत.याद्वारे वॉर्डमध्ये कराओके वर गाणे गाऊन रुग्णांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. रुग्णांनी देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. कराओके वरून कानावर पडणाऱ्या सुमधुर आवाजाला हे रुग्ण उत्स्फूर्तपणे दाद देताना दिसत आहेत. या रुग्णांचे मानसिक स्वास्थ चांगले राहिले तर उपचारात याचा अधिक फायदा मिळणार आहे. याचसोबत या रुग्णांना योग देखील शिकवण्यात येत आहे.
Previous Articleपुणे विभागातील 1,07,153 रुग्ण कोरोनामुक्त : सौरभ राव
Next Article उस्मानाबाद : तरुणीच्या खुनाबद्दल तीघांना जन्मठेप










