प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून 56 कर्मचारी व 6 कर्मचारी संघटना यांच्याविरूद्ध कामगार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आह़े या तक्रारीमध्ये कर्मचाऱयांचा संप हा बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आह़े एसटीच्यावतीने रत्नागिरीतील ऍड. एस़ एम. देसाई हे खटल्याचे कामकाज पाहत आहेत, अशी माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली आह़े
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत़ यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आह़े त्याचप्रमाणे जिह्यातील रहिवाशांची देखील गैरसोय होत आह़े याच कारणामुळे रत्नागिरी विभागाकडून 56 कर्मचाऱयांविरूद्ध कामगार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आल़ी तसेच यामध्ये 6 कर्मचारी संघटना यांच्याविरूद्ध देखील बेकायदेशीर संप पुकारल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आह़े राज्यभरात अशा प्रकारे विविध जिह्यात तक्रार दाखल करण्यात आली आह़े, अशी माहिती देखील एसटीकडून देण्यात आली आह़े
दरम्यान, जिल्हय़ामध्ये सोमवारी देखील एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तर 750 कर्मचारी हजर झाले आहेत़ यामध्ये 87 अधिकृत रजेवर असणाऱया कर्मचाऱयांचा देखील समावेश आह़े हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 273 प्रशासकीय, 202 कार्यशाळा, 77 चालक, 68 वाहक, 43 चालक तथा वाहक आदींचा समावेश आह़े कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले आह़े
दरम्यान, एसटीच्या दरदिवशी चालणाऱया फेऱयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आह़े रविवारी एकूण 20 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आह़े यातून एसटीला सुमारे 5 लक्ष रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आह़े पुढील काही दिवसात आणखी कर्मचारी हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
शासनाच्या दडपशाहीविरूद्ध कर्मचाऱयांची जिद्द कायम
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी मागील दोन महिन्यापासून संपावर आहेत़ या काळात शासनाकडून निलंबन, बदल्या, बडतर्फी आदी मार्गाने दडपशाही सुरू आह़े असे असतानाही आजमितीस 75 ते 80 टक्के कामगार संपावर आहेत़ शासनाने दडपशाहीने संप मोडून काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱयांमध्ये जिद्द कायम आह़े असे संपावर बसलेल्या एसटी कर्मचाऱयांनी ‘तरुण भारत’ जवळ बोलताना सांगितल़े
एसटी कर्मचाऱयांना सरकारी सुविधा मिळणे लांबच राहिले असून कर्मचारी हलाखीच्या परिस्थितीत काम करत आहेत़ त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला मिळाला पाहिज़े यासाठी राज्य शासनामध्ये एसटीचे विलीनीकरण होणे अत्यावश्यक आह़े विलीनीकरणाच्या लढय़ाला सामान्य जनतेचा पाठिंबा देऊन तो बळकट करावा, अशी भूमिका एसटी कर्मचाऱयांनी घेतली आह़े एसटी तोटय़ात आहे असे कारण दाखवून तिचे खासगीकरण करण्याच्या खटपटीत सरकार अनेक वर्ष असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱयांनी केला आह़े
खाजगी ट्रव्हल्स गाडय़ांना परवानगी देण्यात आली आह़े यानंतर एसटीच्या गाडय़ा चालवण्यासाठी त्या खासगी कंत्राटदारांच्या ताब्यात देण्यात आल्य़ा आता गाडय़ाही कंत्राटदारांच्या आणि चालक-वाहकही कंत्राटदाराचे असे प्रकार सुरू झाले आहेत़ हा प्रकार सरकारी मालमत्ता खासगी भांडवलदार यांच्या ताब्यात देण्याचे कारस्थान आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनांनी केला आह़े









