– तब्बल 68 मुलांनी गमावला एक पालक
जान्हवी पाटील/रत्नागिरी
कोरोना महामारात अनेक लोकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. यामध्ये काही चिमुकली आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. रत्नागिरी जिल्हÎात 2 लहानगे आईöवडिलांचे कोरोनाने निधन झाल्याने अनाथ झाली असून तब्बल 68 मुलांच्या नशिबी एक पालकत्व आल्याची माहिती महिला बालविकास विभागाचे अधिकारी आर. बी. काटकर यांनी `तरूण भारत’ला दिल़ी
कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एक रकमी 5 लाख रूपयांची मुदत ठेव व बालक सक्षम होईपर्यंत बालसंगोपन योजनेतून त्याचा खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अद्यापही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र या आठवडÎात याची अंमलबजावणी सुरू होईल व त्यासाठी प्रस्तावही आपण तयार करत आहोत. रत्नागिरी जिह्यात दापोलीतील 2 अनाथ मुले व 68 मुले एक पालक झाली आहेत. या योजनेसाठी त्यांचा प्रस्ताव देण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास अधिकारी आर. बी. काटकर यांनी दिली.
शासनाने जाहीर केलेल्या बालसंगोपन योजनेत 1 मार्च 2020 रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई-वडिल) मृत्यू पावलेले किंवा एका पालकाचा कोविडमुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (1 मार्च2020) पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशा शुन्य ते 18 वयोगटातील बालकांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हÎातील संबंधित 2 अनाथ मुले व 68 एक पालक मुले यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसेच बालगृह किंवा इतर सामाजिक संस्थेत ठेवण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले. मात्र संबंधित 2 अनाथ मुलांची जबाबदारी नातेवाईकांनी घेतली असून 68 एक पालकधारकांनीही मुलांना संस्थेत ठेवण्यास नकार दिला. मुळात निराधार मुलांना नातेवाईकांच्या सहवासात ठेवणे सर्वाधिक चांगले आहे. पालक गेल्यानंतर या मुलांना जवळच्या व्यक्तींची गरज असते. अशी मुले नातेवाईकांकडे राहत असली तरी बालसंगोपन योजनेचा लाभ या मुलांना देण्यात येणार आहे. त्यांना इतर कोणत्याही अडचणी येवू नयेत, यासाठी जिल्हा बालविकास विभागाकडून सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचेही काटकर यांनी सांगितले.
निराधार बालकांना संपर्काचे आवाहन
कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांना शोधण्याचे काम सामाजिक संस्थांच्या मदतीने व आरोग्य विभागाच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा महिला बालविकास विभागाने सुरू केले आहे. जिल्हÎात कोविडमध्ये पालकांचे निधन झाल्याने निराधार झालेली बालके असतील तर त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 तसेच सेव्ह द चिल्ड्रन्स 7453015518, अध्यक्ष बालकल्याण समिती- 9822983620, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- 9225892325, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय- 02352220461 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.









