प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील 2 मिठाई व्यावसायिकांच्या पदार्थांचे अहवाल सदोष आढळून आले आहेत़ काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाकडून या मिठाईच्या दुकांनामधील अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होत़े हे अहवाल सदोष असल्याचे स्पष्ट झाल्याने दिवाळीच्या तोंडावर खरेदीदारांचे धाबे दणाणले आहेत़
अन्नपदार्थांमध्ये भेसळीवर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विविध दुकानांमधून नमुने घेत असत़े जिह्यात प्रत्येक महिन्याला 16 नुमने घेण्यात येत आहेत़ ऑक्टोबर 2020 मध्ये 21 नमुने घेण्यात आले होत़े यामध्ये मिठाईची 3 दुकाने, दुध 3, बेसन 1, तुरडाळ 1, देशी दारू 3, पनीर 1, श्रीखंड 1 आदी पदार्थांचे नमुने घेण्यात आले होते. कारोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून मिठाईची विक्री करावयाची आह़े दिवाळीत खाद्यपदार्थांना मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. अशावेळी ग्राहकांची फसवणूक होवू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाला तपासणीचे निर्देश आहेत़ त्यानुसार ही कार्यवाही होत आह़े शहरातील या 2 मिठाई व्यावसायिकांच्या पदार्थांचे अहवाल सदोष आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत़
या संदर्भात अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे यांनी सांगितले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध पदार्थांच्या नमुन्याची तपासणी करण्यात येत आह़े नव्याने जारी शासनाच्या निर्देशानुसार मिठाईच्या पदार्थांवर एक्स्पायरी डेट लिहिणे बंधनकारक आह़े यासह अन्य बाबींवर लक्ष ठेवण्यात येत आह़े









