रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यां मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परबही करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत.
Previous Articleखटावमध्ये भराव ढासळून रस्ता तुटला
Next Article तणावपुर्ण शांतता..अन् कोंडमारा..!









