बेळगाव : रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा शुक्रवारी 12 फेब्रुवारीपासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ होत आहे.
सदर स्पर्धेत डी. के. लायन्स, एक्स्ट्रिम स्पोर्ट्स, साईराज वॉरियर्स, साई स्पोर्ट्स, लायंगर, विश्रुत स्ट्रायकर्स, झेवर गॅलरी डायमंड व अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स अशा आठ संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक खेळाडूंसाठी आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला चषक, इन्पॅक्ट खेळाडू, उत्कृष्ट झेल व सामन्यात सर्वाधिक षटकार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
बुरजाई स्पोर्ट्स क्लब हाफपिच क्रिकेट स्पर्धा 14 रोजी
बेळगाव : बुरजाई स्पोर्ट्स क्लब हट्टीहोळी गल्लीतर्फे खुल्या हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम होंडा, महात्मा फुले रोड येथे प्रकाशझोतात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 21111 रू. रोख व उपविजेत्या संघाला 11111 रूपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी शुभम गंधवाले, महेश नाईक लगान यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









