रविवारी रात्रीची घटना वारंवार घडणाऱया प्रकाराने आश्चर्य
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील रत्नदुर्ग किल्ला परिसरातील डोंगरावरील गवताला रविवारी सायंकाळी अचानक आग लागल़ी या परिसरात दाट वस्ती असल्याने या आगीचा जवळपासच्या घरांना धोका निर्माण झाला होत़ा सुदैवाने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना वेळीच आग विझविझ्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळल़ा
रत्नदुर्ग किल्ला परिसरातील डोंगरावर मोठय़ा प्रमाणावर सुकलेले गवत दिसून येत होत़े रविवारी सायंकाळी 8 च्या सुमारास या गवताला आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आल़े अवघ्या काही क्षणातच गवताला लागलेल्या या आगीचे वणव्यात रूपांतर झाल़े आगीचे लोण वाढत गेल्याने येथील दाट वस्तीच्या घरांना देखील धोका निर्माण झाला होत़ा
या घटनेची माहिती मिळाताच रत्नागिरी नगर परिषदेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाल़े परिसरातील भडकलेला वणवा नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांकडून करण्यात आल़े मात्र वाऱयामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होत़े अखेर 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आल़ी त्यामुळे आजूबाजूच्या घरांना निर्माण झालेला धोका टळल़ा
या डोंगर परिसरात अज्ञाताकडून लावण्यात येणाऱया आगीचे प्रकार दरवर्षी समोर येत आह़े प्रकाराला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आह़े









