सुट्टय़ांचा अडसर, आतापर्यंत 90 टक्के गाडय़ांचे पासिंग
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी एसटी बसचे पासिंगची प्रक्रिया अद्याप अपूर्णच राहिली आह़े आतापर्यंत 90 टक्के गाडय़ांची आरटीओ पासिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आह़े तर उर्वरित येत्या 8 दिवसात करण्यात येणार आह़े दरम्यान सुट्टय़ांमुळे पासिंगच्या कामाला उशीर होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
अशामध्ये जिह्यातील सुमारे 200 बसचे आरटीओ पासिंग झाले नसल्याने या बस विविध आगारामध्येच पडून आहेत़ यामुळे कर्मचारी हजर होवूनही पूर्ण क्षमतेने फेऱया सुरू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान येत्या 10 दिवसात सर्व बसचे पासिंग करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱयांकडून देण्यात आली. एसटीच्या बसचे दरवर्षी आरटीओ पासिंग करण्यात येत असत़े वाहतूक नियमित सुरू असताना टप्प्याटप्प्याने या बस पासिंगसाठी पाठवण्यात येत असतात़
मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱयांचा संप असल्याने रत्नागिरी विभागाकडून आरटीओ पासिंग करणे बंद ठेवण्यात आले होत़े आता कर्मचारी नियमित कामावर हजर होत असल्याने बसच्या पासिंगचा प्रश्न पुढे आला आह़े दरम्यान रत्नागिरी विभागाकडून दरदिवशी 20 ते 25 बस पासिंगसाठी उपप्रादेशिक विभागाकडे पासिंगसाठी पाठवण्यात येत आह़े लवकरात हे पासिंग करून घेण्यासाठी अधिकारी स्वतःहून लक्ष घालत आहेत़ पुढील 10 दिवसात सर्व एसटी बसचे पासिंग करून घेण्यात यईल, असे एसटीच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. सर्व बसचे पासिंग झाल्याशिवाय जिह्यातील वाहतूक पूर्ववत करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
सर्वच मार्गावर बसफेऱया सुरू
मे महिना हा मुंबई-पुण्यातून येणाऱया चाकरमान्यांमुळे गजबजलेला असत़ो अशावेळी एसटी गाडय़ांची बुकींग मोठय़ा संख्येने होत असत़े दरम्यान काही बसची पासिंग प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने अद्यापही पूर्ण क्षमतेने बससेवा देण्यात रत्नागिरी विभागाला शक्य झालेले नाह़ी असे असले तरीही सर्वच मार्गावर बसफेऱया सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱयांकडून देण्यात आली.









