सोशल मीडियावर व्हायरल झाले छायाचित्र
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह स्वतःची अनोखी शैली आणि उत्तम अभिनयामुळे चर्चेत असतो. रणवीरेन स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर 83 चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तो बॅटने शॉट मारताना दिसून येतो आणि पोस्टरच्या मागील बाजूस 83 लिहिले असल्याचे दिसून येते.
या छायाचित्रामध्ये त्याचा चेहरा दिसून येत नाही. चित्रपटाचा पहिला टीझर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरची सुरुवात एका स्टेडियमद्वारे होते, ज्यात एक सामना अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचलेला असतो. या चित्रपटाची कथा भारतीय संघाच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाच्या अवतीभोवती फिरणारी आहे.

कबीर खानकडून दिग्दर्शित 83 चित्रपट 1983 च्या विश्वचषक विजयी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देवचा बायोपिक असून यात रणवीर त्याची भूमिका साकारत आहे. तर कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पदूकोन दिसून येणार आहे. याचबरोबर चित्रपटात ताहिर राज भसीन, जीवा सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील.
या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फँटम फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत केली जातेय. हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट नाताळावेळी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषेतही प्रदर्शित करण्यात येईल.









