बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याच्या गुडघ्यावर नुकतीच मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. खरं तर, गेल्या महिन्यात ‘इन्स्पेक्टर अविनाश’च्या सेटवर एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता रणदीपने त्याच्या सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याचे कॅप्शन सध्या चर्चेत आहे. रणदीपने स्वतःचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, दुखापत तर गुडघ्याला झाली आहे, पण मला काही आठवत का नाही? यासोबतच त्याने हसणारे इमोजीही बनवले आहेत. रणदीपला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उजव्या पायाची ही दुखापत मला 12 वर्षांपूर्वी झाली होती. पोलो सामन्यादरम्यान मी घोडय़ावरून पडलो. नंतर घोडा माझ्या उजव्या पायावर पडला. माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यात प्लेट्स आणि स्क्रू टाकण्यात आले, नंतर ते काढावे लागणार होते, पण कधी वेळ नसायचा तर कधी पैसा नव्हते, काही तरी कारणाने ते होऊ शकले नाही.








