वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट मंडळातर्फे 2019-20 च्या क्रिकेट हंगामातील रणजी स्पर्धेत डीआरएसचा वापर मर्यादित स्वरूपात करण्यात आल्याने पंचांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
2019-20 च्या क्रिकेट हंगामात सौराष्ट्रने पहिल्यांदा रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात रणजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला गेला होता. या सामन्यात डीआरएसचा वापर मर्यादित स्वरूपात करण्यात आला होता. रणजी स्पर्धेतील ही ऐतिहासिक घटना म्हणून नोंद झाली आहे. या अंतिम सामन्यासाठी एस. रवी, के.एन.अनंतपद्मनाभन आणि यशवंत बर्डे यांची पंच म्हणून नियुक्ती केली होती. सामन्याच्या तिसऱया दिवसानंतर बर्डेच्या जागी शमशुद्दीन या पंचांची नियुक्ती केली होती. या पंचांनी रणजी अंतिम सामन्यात डीआरएसचा वापर मर्यादित स्वरूपात केल्याने त्यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानावर गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर प्रथमच करून खेळविलेल्या कसोटी सामन्यात एस रवी यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.









