प्रतिनिधी/ खेड
मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रघुवीर घाटात शुक्रवारी दुसऱयांदा दरड कोसळून मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. कोसळलेल्या दरडीमुळे सातारा जिल्हय़ातील 16 गावांचा संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरड बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रघुवीर घाटात पर्यटनासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी फारशी वाहतूक नसली तरी नजीकच्या गावात ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांची वर्दळ सुरू असते. मात्र कोसळलेल्या दरडीमुळे मार्गच बंद झाल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.









