पाटणा/प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंह यांचं रविवारी कोरोनानं निधन झालं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ते निकटवर्तीय होते. बिहारच्या राजकारणात रघुवंश बाबू अशी त्यांची ओळख होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर रघुवंश प्रसाद सिंह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना त्यांची आज प्राणज्योत मालवली.
माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिंह यांना आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आज (१३ सप्टेंबर) त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.