वृत्तसंस्था/ लंडन
चालू वर्षांमध्ये होणारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रग्बी लीग ऍशेस मालिका रद्द केल्याची घोषणा सोमवारी रग्बी फुटबॉल लीग आणि ऑस्ट्रेलिया रग्बी लीग कमिशनने केली आहे.
इंग्लंडमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन कसोटीची रग्बी लीग ऍशेस मालिका खेळविली जाणार होती. गेली 17 वर्षे कोणताही खंड न पडता ही मालिका घेतली जात होती. पण आता 2022 नंतर होणाऱया उभय संघातील रग्बी लीग ऍशेस मालिका संदर्भात बोलणी सुरू असल्याचे सांण्यात आले. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये विश्वचषक रग्बी स्पर्धा घेतली जाणार आहे. गेल्या आठवडय़ात बंदीस्त स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय रग्बी लीग स्पर्धेला पुन्हा सुरूवात करण्यात आली होती. चालू वर्षीचा रग्बी हंगाम 25 ऑक्टोबरला समाप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती रग्बी लीग फेडरेशनचे प्रमुख कार्यकारी रिमेर यांनी दिली. इंग्लंडचा दौरा रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियन रग्बी लीगने नाराजी व्यक्त केली, असे राष्ट्रीय रग्बी लीगचे हंगामी सीईओ अँड्रय़ू ऍबडो यांनी सांगितले.









