ऑनलाईन टीम/लडाख
संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच भारतीय जवानांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. इंडो–तिबेटीअन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) जवानांनी सर्व भारतीयांचा उर भरून येईल अशी कामगिरी केली आहे. रक्त गोठवणार्या तापमानातही भारतीय जवानांनी 17 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावला आहे.
हिमालयात सर्व बाजूंनी बर्फाने वेढले असताना, उणे 20 तापमानातही भारतीय जवावांनाचे देशावर असणारे प्रेम दिसून आले आहे. हाडे गोठवणार्या थंडीतही या जवानांनी 17 हजार फूटावर तिरंगा फडकवत प्रजासत्ताक दिन साजरा केला. एएनआय या वृत्तसंस्थेने याचा फोटो आपल्या व्टिटर हँडलवरून प्रसिध्द केला आहे. या फोटोत या जवानांच्या चारही बाजूंनी बर्फ दिसत असून जवानाच्या हातात तिरंगा आहे.