चिपळूण वैश्य समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर/ चिपळूण
तब्बल शंभरवेळा रक्तदान करण्याची किमया जिल्हय़ातील देवरूख येथील उदय कोळवणकर यांनी केली आहे. चिपळूण वैश्य समाजातर्फे शहरात नुकत्याच पार पडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये त्यांच्या जिगरबाज कर्तृत्वाचा सन्मान करत विशेष सत्कार करण्यात आला. या शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
चिपळूण नगर परिषद व भक्तश्रेष्ठ श्री वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण यांच्या विशेष सहकार्याने हे शिबीर यशस्वी करण्यात आले. या शिबिरात 135 रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. मात्र डेरवण रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या मागणीनुसार 70 जणांना संधी देण्यात आली. या शिबिराला माजी आमदार विनय नातू, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, चिपळूण अर्बन बँकेच्या चेअरमन राधिका पाथरे, व्हाईस चेअरमन निहार गुढेकर, मिलिंद कापडी, नगरसेवक परिमल भोसले, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक संजय रेडीज, प्रवीण रेडीज, सतीश खेडेकर आदींनी भेट दिली.
यावेळी संस्थेचे सुचय रेडीज, विश्वस्त उदय गांधी, जगन्नाथ रेडीज, अनिल खातू, शैलेश जागुष्टे, संस्थेचे अध्यक्ष पंकज कोळवणकर, अमोल टाकळे, प्रमोद गांगण, प्रतीक रेडीज, नयन साडविलकर, नितीन गांधी, संतोष टाकळे, अश्विनी महाकाळ, प्रणय वाडकर, सिद्धेश लाड, सचिन साडवीलकर, उमा जागुष्टे, जगदीश साडविलकर, नगरसेवक आशिष खातू, वर्षा जागुष्टे, रसिका देवळेकर, रत्नदीप देवळेकर आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी चिपळूण वैश्य समाज चिपळूण, चिपळूण वैश्य युवक संघटना, वैश्य महिला मंडळ, वधु-वर सुचक मंडळातील सर्व संचालक तसेच राम रेडीज, केतन रेडीज, बादल कोकाटे, प्रसाद खातू, आशुतोष गांधी, दिगंबर सुर्वे, डॉ. ऋतुजा टाकळे यांनी विशेष मेहनत घेतली.









