कधी हा विचार केला आहे की तुमचे भोजन तुमच्या ब्लडगुप म्हणजे रक्तगटानुसार असले पाहिजे? नाही ना? वास्तविक, वेगवेगळ्या ब्लड गुपच्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेणे आवश्यक असते.
हा डाएट प्रोग्रम ‘लेक्टीन थेअरी’वर आधारित आहे. त्यानुसार आहार घेतल्यास लठ्ठपणाची समस्या भेडसावणार नाही आणि डायटिंगची गरज पडणार नाही.
- ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट असणार्यांनी मांस, फिश आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.
- ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगट असणार्यांनी मांस, फिश, दूध, दही आणि दुधातून तयार झालेले पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
- ज्या लोकांचा ब्लड गुप ‘ए’ आहे, त्यांनी आपल्या भोजनात अन्नधान्याचा प्रयोग जास्त प्रमाणात करायला पाहिजे. तसेच या लोकांनी उष्णता वाढवणारे पदार्थ कमी खावेत.
- ब्लड गुप ‘एबी’ (ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह) असलेल्या लोकांनी प्रोटीन, कार्बोहाइड्रेटस्चा भरपूर वापर आपल्या आहारात अधिक वाढवला पाहिजे.