प्रतिनिधी/ बेळगाव
रंगोली या देशभरात फॅशन प्रदर्शने आयोजित करणाऱया समुहातर्फे बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या रंगोली स्पेशल फॅशन व लाईफ स्टाईल प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मराठा मंदिरमध्ये तीन दिवस हे प्रदर्शन असून रविवारी समारोप होणार आहे.
रंगोली एक आग्रणी फॅशन व लाईफ स्टाईल प्रदर्शन असून अल्पावधीतच फॅशनप्रेमींच्या मनात रंगोलीने स्थान मिळविले आहे. प्रदर्शनात देशभरातील प्रसिद्ध स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. लग्नसराईसाठी लागणारे स्पेशल कलेक्शन येथे उपलब्ध आहे. महिलांसाठी सणासुदीच्या काळात लागणारे कपडे, लग्नसराईचे कपडे, ज्वेलरी, बेडसीट, फुटवेअर, हेअर ऍक्सेसरीज, डिझाईन कुर्ती, साडय़ा, इंडोवेस्टर्न आणि होमडेकोअरचे सर्व साहित्य उपलब्ध आहे.
या प्रदर्शनात मुंबई, कोलकाता, नागपूर, दिल्ली, जयपूर, इंदोर, बनारस, चंदीगढ, चेन्नई, सुरत, कानपूर, लखनौ, रायपूर येथील डिझाईनर्स सहभागी झाले आहेत. जवळपास 70 स्टॉल्स आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यादृष्टिने कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले.









