सांगली/प्रतिनिधी
सांगली येथील नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक तर अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, मुकुंद पटवर्धन हे होते. प्रारंभी नटराज व धन्वंतरी पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. नाईक यांनी सांस्कृतिक क्षेत्र जोमाने कार्यरत झाले तरच कोरोनाने आलेली मरगळ दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार लौकरच जाहीर करण्यात येतील असे विजयदादा कडणे यांनी सांगितले.
दैवज्ञ भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास श्रीनिवास जरंडीकर, सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे, विशाल कुलकर्णी, सुमित साळुंखे, सुहास पाटील रोहन पाटील, रोहित पवार, डाॅ. अनुराधा साळुंखे आदी सदस्य उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष विजय कडणे यांनी केले. तर आभार सचिव राजेंद्र पोळ यांनी मानले.








