प्रतिनिधी/ मडगाव
भारतात योग शिक्षणाचा प्रसार करणाऱया अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाने आचार्य राजेशकुमार ठक्कर यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केली आहे.
आचार्य ठक्कर हे गोव्यात योग शिक्षक म्हणून यापूर्वीच कार्यरत असून त्यांच्या अधिकृत नियुक्तीचे पत्र हल्लींच जारी करण्यात आले आहे. महासंघाचे राष्ट्रीय संयोजक योगगुरु मंगेश त्रिवेदी यांनी नवी दिल्ली येथून आचार्य राजेशकुमार ठक्कर यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.









